रस्त्याच्या उदघाटनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने चालवला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:04 PM2021-03-14T16:04:32+5:302021-03-14T16:05:41+5:30

मेडद येथील पाणंद रस्त्याचे उदघाटन

For the inauguration of the road, the Collector drove the JCB in his own unique style | रस्त्याच्या उदघाटनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने चालवला जेसीबी

रस्त्याच्या उदघाटनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने चालवला जेसीबी

googlenewsNext
ठळक मुद्देमे महिनाअखेर सर्व कामे होतील पूर्ण

बारामती: मेडद येथील पाणंद रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी थेट जेसीबीचे स्टेअरिंग हाती घेऊन पाणंद रस्त्याचे वेगळ्या स्टाईलने उदघाटन केले. 

मेडद येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून आणि शरद पवार ग्रामसमृद्धी योजने’च्या माध्यमातून येथील आरटीओ
कार्यालयापासून ते कऱ्हा नदी बंधाऱ्यापर्यंतच्या पाणंद रस्त्याच्या दुरूस्तीस सुरूवात करण्यात आली होती. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख देखील उपस्थित होते. यावेळी  मेडद येथे पाणंद रस्ताचे उदघाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.

तत्पूर्वी ग्रामस्थांच्या सजवलेल्या बैलगाडीतून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना कार्यक्रमस्थळापर्यंत आणले. यावेळी बैलगाडीचे सारथ्यदेखील जिल्हाधिकारी देशमुख यांनी केले. पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतंर्गत बारामती मध्ये एकुण १३३ रस्ते लांबी १८९ किमी प्रस्तावित केले असुन १३ कामे लांबी १४ किमी पुर्ण झाले आहेत. ही सर्व कामे लोकसहभागातुन होणार आहेत. मे महिनाअखेर सर्व पुर्ण होतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: For the inauguration of the road, the Collector drove the JCB in his own unique style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.