वेल्हा ग्रामीण रुग्णालय येथे रक्कम रु.१५.८४ लक्ष आमदार स्थानिक निधीतून रुग्णसेवेकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
आमदार संग्राम थोपटे यांनी यापूर्वी वेल्हे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पानशेत व करंजावणे येथे दोन रुग्णवाहिका दिल्या असून, वेल्हे तालुका हा जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणारा पहिला तालुका आहे. वेल्हे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. परमेश्वर हिरास यांनी आमदार संग्राम थोपटे यांचे आभार मानले. ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणी करणे रक्कम रु.५२ लक्ष या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगरी भागातील वेल्हे ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे रक्कम रु.५२ लक्ष इतक्या रकमेस मान्यता मिळाली असून कोरोना आजाराचे वाढते रुग्ण ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असल्यामुळे ऑक्सिजनसाठा कमी असायचा, शिवाय ऑक्सिजनवर असलेली अतिजोखमीच्या रुग्णास उपचारासाठी कसरत करावी लागायची. ऑक्सिजनसाठी शासनास खूप जास्त किंमत मोजावी लागायची मात्र जनरेशन प्लांटमुळे या ठिकाणी एकाचवेळी साधारता ३० रुग्णांना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध होणार आहे व साठवणूक ही करण्यात येणार आहे. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे,अमोल नलावडे, शिवराज शेंडकर आकाश वाडघरे, संदीप नगीने ,गणेश जागडे शिवाजी चोरघे शोभा जाधव , पोलीस निरीक्षक मनोज पवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अंबादास देवकर, ग्रामीण रुग्णालय वेल्हा डॉ.परमेश्वर हिरास,डॉ.जितेंद्र जाधव सा.बांधकाम उपअभियंता संकपाळ, उपकार्यकारी अभियंता गीते, जिओ कंपनीचे अधिकारी योगेश देशपांडे,.मधुकर कोहाले, पद्माकर मिठारी, अभिषेक सिंग पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ त्याचप्रमाणे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालय वेल्हे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.