नारायणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या फंडातून १८ लाख खर्च करून उभारलेल्या विठाई साबीर उद्यानाचे उद्घाटन बालचमूंच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती सरपंच योगेश पाटे यांनी दिली.
नारायणगावातील हवेली आळीत ग्रामपंचायत फंडातून १८ लाखांचा निधी वापरून लहान मुलांसाठी झोपाळा, पाळणे, घसरगुंडी, विविध खेळणी, साहित्य व ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, ट्रॅक, ओपन जीम, सायंकाळी आकर्षक लायटिंग, म्युझिक अशा विविध सुविधा असणारी विठाई साबीर उद्यान तयार केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावात एक गार्डन असावे, अशी नागरिकांची विशेषतः लहान मुलांसाठी पार्क किंवा उद्यान असावे अशी मागणी होती. सरपंच योगेश पाटे यांनी पंचवार्षिक निवडणुकीत नागरिकांना भव्य गार्डनचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता त्यांनी केली.
उद्यानाचे उद्घाटन लहान बालकांच्या हस्ते करण्यात आले. या उद्यानाला नारायणगावसाठी मोठे योगदान असणारे व पुढच्या पिढीला ही नावे कायम स्मरणात राहावं या उद्देशाने माजी कामगार मंत्री स्व. साबीरभाई शेख व ज्येष्ठ तमाशा कलावंत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या स्व. विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या नावाने उद्यनाला विठाई साबीर कुंज असे नाव देण्यात आले आहे. यावेळी विठाबाई यांचे वंशज नाव कैलास नारायणगावकर, राजेश नारायणगावकर, मालती इनामदार व साबीरभाई यांचे वंशज सिद्दीक शेख, अजीज शेख, सरपंच योगेश पाटे, उपसरपंच पुष्पा आहेर, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट, आरिफ आतार, राजेश बाप्ते, गणेश पाटे, संतोष पाटे, सारिका डेरे, सुप्रिया खैरे, संगीता खैरे, महाराष्ट्र राज्य प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुभाष भुजबळ, अशोक गांधी, डॉ. सदानंद राऊत, अनिल खैरे, भागेश्वर डेरे, किरण ताजणे, हेमंत कोल्हे, शरद दरेकर, राजेश रत्नपारखी, लहान मुले, त्यांचे पालक व समस्त ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. उद्यान डिझायनर स्वप्निल धामणे, कॉन्ट्रॅक्टर प्रकाश निमसे व सहकार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन मेहबूब काझी यांनी केले. आभार राजेश बाप्ते यांनी मानले.
१९नारायणगाव
विठाई साबीर उद्यानाचे उद्घाटन लहान मुलांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
190821\whatsapp image 2021-08-16 at 2.05.01 pm.jpeg
ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून विठाई साबीर उद्यानाचे उदघाटन लहान मुलांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.