याबाबत माहिती अशी की, खडकवासला परिसरात राहणारी ३८ वर्षीय महिला आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी सोमवारी वडगांव बुद्रुक परिसरात आली होती. सोमवारी हळदी समारंभ असल्याने फिर्यादी महिला ही आपल्या वडगांव बुद्रुक येथील भावाच्या घरी मुक्कामास होती. फिर्यादी महिलेने लग्नात घालण्यासाठी आपले १० तोळे सोन्याचे दागिने सोबत आणले होते. आरोपी व फिर्यादी महिलेचे घर शेजारी असल्याने हळदी समारंभासाठी फिर्यादी व त्यांच्या भावाच्या घरातील सर्वजण गेले होते. दरम्यान फिर्यादी महिलेच्या भावाच्या घराचे दार उघडे असल्याने आरोपी दत्ता गोरे हे घरात शिरून कपाटात ठेवलेले २ लाख ४४ हजार ६६५ रुपयांचे १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन गेला. लग्नाच्या दिवशी सोने घालण्याच्या उद्देशाने फिर्यादी महिलेने कपाटात दागिने तपासले असता दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त पोमजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे, पोलीस कर्मचारी विशाल गवळी, दयानंद तेलंगे यांनी केली.
अवघ्या चार तासांत आरोपीस अटक
सिंहगड रस्ता ठाण्यातील पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासांत आरोपी असणाऱ्या नवरदेवाच्या पित्याकडून १० तोळे सोने जप्त केले. सुरुवातीला आरोपीने स्वतःच्याच मुलाच्या लग्नात कोण चोरी करणार? अशी उडवा- उडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करीत होता.त्या वेळी पोलिसांनी '''' पोलीस खाक्या '''' दाखवताच त्याने गुन्हाची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.