पराभवी उमेदवाराला मारहाण
--
जेजूरी : निवडणुकीत कशी जिरवली असे म्हणत कोळविहिरे (ता. पुरंदर) येथे तिघांना मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास कोळविहिरे येथे घडली. अनिकेत अंकुश नाणेकर, राहुल सतीश माने, सप्नील विठ्ठल थोपटे, श्रीकांत नाथसाहेब राजपुरे, विशाल सोमनाथ शितोळे, विकास अरुण भोर, दशरथ रामचंद्र घोरपडे, गणेश बालू नाणेकर आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अंजना सर्जेराव भोर यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरिक्षक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
--
यवत हाणामारी; चौघांवर गुन्हा दाखल
यवत : मिरवडी (ता. दौंड) येथे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर झालेल्या मिरवणुकीत विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही गटाने परस्पर फिर्याद दाखल केली. त्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मिरवडी गावामध्ये घडली.
आकाश तुकाराम शेंडगे यांचनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुलाब शंकर टकले, ऋषीकेश अतुल टकले, शांताराम पांडुरंग थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तर गुलाब शंकर टकले यांच्या फिर्यादीनुसार पांडुरंग एकनाथ शेेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आकाश शेंडगे यांच्या फिर्यादीनुरार टकले व थोरात हे त्यांच्या उमेदवार ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्यामुळे डीजे लावून मिरवणुकीत गुलाल उधळून नाचत होते. शेंडगे यांच्या दुकानासमोरून मिरवणूक जाताना त्यांनी शेंडगे यांना अपशब्द वापरले. त्याचा जाब विचारला असता त्यांनी दगडाने मारहाण केली. तर गुलाब टकले यांच्या फिर्यादीनुसार टकले हे त्यांच्या कारमधून टकलेवस्तीकडे जाताना विजयी मिरवणूक पाहून खाली उतरल्यावर पांडुरंग शेंडगे यांनी आमच्या उमेदवाराला पाडल्याने खूप खूष झालास का, असे म्हणत मारहाण केली व मोटारकारची काच फोडली.
दोन्ही गुन्हे स्वतंत्रपणे यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक पाटील तपास करत आहेत.
----
कोळविहीरे गावात हाणामारी ; सहा जणांवर गुन्हा
जेजुरी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभतू झाल्याच्या कारणावरून कोळविहिरे गावाच्या हद्दीतील भोरवाडी येथे सहा जणांनी विजयी उमेदवारीच्या समर्थकाला मारहाण केली. ही घटना १८ जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास भोरवाडी येथील एका किराणा दुकानासमोर घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला.
सर्जेराव तात्याबा भोर, अर्जुन तात्याबाभोर, दशरथ तात्याबा भोर, विशाल सर्जेराव भोर, नीलेश दशरथ भोर, उमेश पिलाणे (सर्वजण रा. कोळविहिरे, ता. भोर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबबत पोलिसानीदिलेल्या माहितीनुसार विकास अरुण भोर हे त्यांचे मित्र अंकुश नाणेकर, श्रीकांत राजपुरे, विशाल शितोळे यांच्या समवेत मोटारकारमधून निघाले असातना वाटेतच त्यांना आरोपींनी अडवले. ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाल्याचा रागात त्यांनी चौघांना लाकडी व लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक महाडीक तपास करत आहेत.