शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

समाविष्ट गावांचा पावसाळा ‘खड्ड्यात’ च जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:42 PM

शासनाच्या अद्यादेशानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये शहरालगतच्या ११ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला. मात्र, महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्वच गावात सध्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्रचंड खड्डे, पावसाळी गटारांची सोय नाही....

ठळक मुद्देमहापालिकेकडून एका गावात एकाच रस्त्याचे कामरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीचे कारण देत प्रशासनाने केले हात वर११ गावांतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी किमान १०० ते १५० कोटी रुपयांच्या निधी आवश्यकता महापालिकेच्या अंदाजपत्रकात रस्त्यांसाठी केवळ ११ कोटी अशी अत्यंत तुटपुंज्या निधीचीच तरतूद

सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांतील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने किमान १०० ते १५० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असताना रस्त्यांसाठी केवळ ११ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे सध्या एका गावात केवळ एकाच रस्त्यांचे काम करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गावातील नागरिकांकडून रस्त्यांच्या दुरुस्ती मागणी केली जात असताना निधीचे नसल्याचे सांगत प्रशासनाकडून हात वर केले जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.    शासनाच्या अद्यादेशानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये शहरालगतच्या ११ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला. यात उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगाव, शिवणे, मुंढवा, हडपसर, साडेसतरानळी आंबेगाव खुर्द, आंबेगाव बु्र., उंड्री, धायरी या गावांचा यामध्ये समावेश आहे. यातील बहुतेक सर्वच गावांची लोकसंख्या ५० हजाराच्या पुढे गेली आहे. मात्र, येथे अद्यापही अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. वाढत्या लोकसंख्या व शहरीकरणामुळे गावांचा झपाट्याने विकास करण्यासाठी ग्रामपंचायतींची यंत्रणा अपूर्ण पडत होत्या. त्यामुळे आता गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्याने झपाट्याने विकास होईल अशी अपेक्षा होती. परंतु गावे महापालिकेच्या हद्दीत येऊन आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही गावांच्या विकासाकडे अपेक्षित तेवढे लक्ष दिले जात नाही.    महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्वच गावांत सध्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रचंड खड्डे, पावसाळी गटारांची सोय नाही. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरच साठून राहते. पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्त्यांची आणखी दुरावस्था होणार आहे. यामुळे अपघाची शक्यता देखील वाढली आहे. यामुळे या समाविष्ट गावांतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ११ गावांतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी किमान १०० ते १५० कोटी रुपयांच्या निधी आवश्यकता आहे. परंतु, महापालिकेच्या अंदाजपत्रकात रस्त्यांसाठी केवळ ११ कोटी अशी अत्यंत तुटपुंज्या निधीचीच तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनकडून सध्या एका गावात एकाच नवीन रस्त्यांच्या काम हाती घेण्यात आले आहेत. तसेच रस्त्यांची तात्पुरती डागडूजी करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे समाविष्ट गावातील नागरिकांचा यंदाचा पावसाळा तरी खड्ड्यातच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.----------------------रस्त्यांसाठी निधीची गरज पण तरतूद कमीमहापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांतील रस्ते, फुटपाथ व रस्त्यासंदर्भातील अन्य लहान मोठ्या सुविधा पुरविण्यासाठी किमान २०० ते २५० कोटींच्या निधींची आवश्यकता आहे. त्यात तातडीच्या दुरुस्तीसाठी किमान १०० ते १५० कोटी रुपये लागतील. परंतु, महापालिकेने केलेल्या तरतुदीनुसार प्रत्येक गावांत किमान एक नवीन रस्ता व तातडीने डागडुजी करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यामुळे सध्या एका गावात रस्त्यांसाठी १ कोटी ७३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfundsनिधीroad transportरस्ते वाहतूक