नवनाथ यांच्या सदर उपक्रमाची दखल घेऊन त्यांना पुणे जिल्हा परिषदेने कृषीनिष्ठ पुरस्कार २०१८.महाराष्ट्र शासन कृषी खाते मुळशी यानी उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार २०१८.व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार .तसेच लुपिन ह्यूमन सोशल वेल्फर फौंडेशनचा ग्रामीण विकास उत्कृष्ट कार्य पुरस्कार. २०१८इत्यादी पुरस्काराणे सन्मानित केले .तसेच बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यानी पत्राद्वारे त्यांचे कौतुक केले.
त्याच्या जोडीला नवनाथ यानी मुक्तगोठा केला त्यात गिरगाई पाळल्या व त्यांना रासायनिक खताव्यतिरिक्त खाद्य देऊन दूध उत्पादन करू दुधाला चांगला भाव मिळवून उत्पन्न वाढविले .गोठ्यातील शेण व मूत्र एका टाकीत जमा करून पंपाद्वारे विहिरीत सोडले व ते पाणी शेतीसाठी वापरून रासायनिक खताची बचत केली .
त्याशिवाय सीझन नसतानाही काकडी, दोडका, भाजीपाला पिके घेऊन भरपूर उत्पन्न मिळविले.
शेतीसाठी त्यांना त्याचे मोठे भाऊ माजी सरपंच बाबाजी शेळके यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. परिवारातील सर्व सदस्य शेतीमध्ये काम करतात. गावातील इतर शेतकरी नवनाथच्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन चांगले उत्पन्न घेत आहेत. नवनाथ स्वतः १२ तास शेतात काम करतो. अशी माहिती त्याचे भाऊ गोरक्ष शेळके यानी दिली.