Income tax raid Pune: दौंड शुगर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 01:12 PM2021-10-07T13:12:09+5:302021-10-07T13:24:03+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर या खासगी साखर कारखान्यावर केंद्रीय पथकाने गुरुवारी सकाळी सहा वाजता छापेमारी केली (Income tax raid in Pune, it raid pune, ajit pawar)
देऊळगावराजे: आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा टाकण्यात आला आहे. राज्यातील अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू असताना आज सकाळी 6 वाजलेपासून आलेगाव ता. दौंड येथील दौंड शुगर कारखण्यावरतीही चौकशीसाठी पथक दाखल झाले आहे.
सदर पथकाची कारखान्याच्या मुख्य ऑफिसमध्ये चौकशी सुरू असून ऑफिसच्या गेटवर पोलीस व सी. आर. पी. एफ. जवानांचा खडा पहारा असून आत व बाहेर एकाही व्यक्तीला जाण्या-येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. चौकशीसाठी आलेलं पथक नेमकं ईडी, का आयकर विभाग यांचे आहे हे अद्याप समजलेलं नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर या खासगी साखर कारखान्यावर केंद्रीय पथकाने गुरुवारी सकाळी सहा वाजता छापे मारी केली. सुमारे 14 वर्षांपूर्वी दौंड सहकारी हा दौंड तालुक्यातील आलेगावमधील साखर कारखाना विकत घेत त्याचे खासगीकरण करण्यात आले आहे. अजित पवार यांचे नातलग असलेले नगर जिल्ह्यातील जगदीश कदम कारखान्याचे अध्यक्ष आहेत. माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व मुंबईतील बडे प्रस्थ असलेले विवेक जाधव हे या कारखान्याचे संचालक आहेत.