भाजी मंडईमधील समस्या शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तरही समस्या सोडण्यासाठी कोणतीही अंमलबजावणी होत नाही. अडचणीमधील लेखी तक्रार करूनदेखील तक्रार अर्जावर कोणतीही कारवाई मंडई अधिकारी करीत नाहीत नाही. हे काम मंडई अधिकाऱ्यांचे आहे. चेंबर साफ न झाल्यामुळे पावसाळी चेंबर लाईन तुंबलेले आहे. ती सुद्धा साफ केलेली नाही. यावर पंडित जवाहरलाल नेहरू मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बनकर, मयूर फडतरे, संतोष होले, चंद्रकांत टिळेकर, विमल आरू, बाळा पाटोळे, नीलेश जांभूळकर, पप्पू सूर्यवंशी, नितीन काळे, रामदास लोखंडे, उद्धव लोखंडे आदींनी येथील चेबर साफ करून पुन्हा पाणी साचले जाऊ नये, यासाठी पालिकेने पावले उचलण्याची मागणी केली आहे. लाईन व्यवस्थित केलेल्या नाही. त्यामुळे पाणी साचते. काही ठिकाणी नवीन लाईन टाकण्याची मागणी भाजी विक्रेत्यांनी केली आहे.
कोट
पावसाळ्यापूर्वी पावसाळी ड्रेनेज लाईनची साफसफाई करण्यात आली होती. पुन्हा तुंबल्याने परत साफसफाई करून घेण्यात येईल. तसेच पुढे कोठे ब्लाक झाले असेल तर ते शोधण्यात येईल.
- मारुती तुपे, नगरसेवक मनपा
पाहणी करून कशामुळे पाणी साचते. त्याचे कारण शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील.
-अर्चना आल्हाट, मुकादम, मंडई