पुणे : शहरात सोमवारी १४० कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १४४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ५४३ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५़ ५ टक्के इतकी आहे़ आज एकदम दोनशच्या खाली बाधितांचा आकडा आला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या ३११ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ६८२ इतकी आहेत़ आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६८२ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ६१ हजार ५४९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८१ हजार ६५१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७४ हजार २८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================