पुणे : शहरात सोमवारी १४८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४०९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार २८४ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६.४७ टक्के इतकी आहे. गेल्या महिनाभरातील तपासणीच्या तुलनेत ही सर्वात कमी संख्या आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३३३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २०७ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या ७८१ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ३ हजार ८३२ इतकी आहेत. आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६१७ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ६ हजार ९७३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७८ हजार २० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६९ हजार ५७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================