पुणे : शहरात सोमवारी १६२ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १४५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात १ हजार ९४५ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ८़ ३ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ११३ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २०६ इतकी आहे़ आज दिवसभरात ६ जणाचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७७९ इतकी झाली आहे़ शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही आजमितीला १ हजार ३९६ इतकी आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ५२ हजार ५१२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९३ हजार ३४० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ८७ हजार १६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================