पुणे : शहरात रविवारी १९६ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २१९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ९०६ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६.७ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये ११० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २१० इतकी आहे़ आज दिवसभरात ५ जणाचा मृत्यू झाला असून, यापैकी ४ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७७५ इतकी झाली आहे़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही आजमितीला १ हजार ३८३ इतकी आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ५० हजार ५६७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९३ हजार १७८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ८७ हजार २० जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================