पुणे : शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार २३२ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ९़ ६ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये १२० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २०६ इतकी आहे़ आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७८३ इतकी झाली आहे़ शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही आजमितीला १ हजार ४११ इतकी आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ५४ हजार ७४४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९३ हजार ५५६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ८७ हजार ३६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================