पुणे : शहरात शुक्रवारी २३२ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. २९० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ४२८ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६.७ टक्के इतकी आहे़
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये २०६ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहे. ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९३ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २ हजार १११ इतकी आहेत़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७२९ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ९६ हजार २७१ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ८४ हजार २४६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७७ हजार ४०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़