पुणे : शहरात मंगळवारी २३८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४८० कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २ हजार ३८० संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही १० टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी १६९ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर शहरातील आॅक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या ७२४ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ३ हजार ५८४ इतकी आहेत़ आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६२३ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ०९ हजार ३५३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७८ हजार २५८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७० हजार ५१जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================