पुणे : शहरात गुरूवारी २५६ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ११३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार २३० संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ७़ ९ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये १३४ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २३३ इतकी आहे़ आज दिवसभरात एका जणाचा मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७८९ इतकी झाली आहे़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही आजमितीला १ हजार ६१७ इतकी आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ६१ हजार ३१८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९४ हजार ५१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ८७ हजार ६४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================