पुणे : शहरात रविवारी २९४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३१७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ४ हजार १४ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ७़ १३ टक्के इतकी आहे़ दरम्यान शहरातील आॅक्सिजनवरील रूग्ण संख्या ही हजाराच्या आत आल्याचे समाधानकारक चित्र पाहण्यास मिळत आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३८७ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २२४ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर शहरातील आॅक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या आज पुन्हा एक हजाराच्या आत आली असून, आजमितीला ही संख्या ८०० इतकी झाली आहे़ तसेच शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार १५२ इतकी आहे़ आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला असून, यातील १ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५३८ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ८ लाख ६४ हजार ३८० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७४ हजार १३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ६४ हजार ३५० जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================