पुणे : शहरात शुक्रवारी ३०२ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. ३२४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ४ हजार १४० संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ७़२९ टक्के इतकी आहे़
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २५० गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहे. यापैकी १६० जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ६३७ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ३ हजार २९४ इतकी आहेत़ आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६३२ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख २१ हजार ३३५ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी १ लाख ७९ हजार ७१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७१ हजार १४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़