पुणे : शहरात रविवारी ३०९ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४४४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ४९६ संशयितांची तपासणी केली आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४२२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २५२ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार १४२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार १६४ इतकी आहे़ आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यातील २ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ४९३ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ८ लाख ४० हजार ९६२ जणांची कोरोना तपासणी केली असून, यापैकी १ लाख ७२ हजार ७८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ६२ हजार ४२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================