पुणे : शहरात बुधवारी ३१० कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३५३ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ८५२ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ८.४ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये २०६ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९३ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार २५५ इतकी आहेत़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७२० इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख ८९ हजार ३५६ जणांची कोरोना तपासणी केली असून, यापैकी १ लाख ८३ हजार ७८७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७६ हजार ८१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़