लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची वाढ मंगळवारीही कायम राहिली आहे. दिवसभरात नव्या ३ हजार २२६ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे़ दिवसभरात गेल्या काही दिवसांच्या तुलनते तपासणीचे प्रमाण तीन हजाराने कमी झाले असले, तरी तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या २४.०१ टक्के इतकी आहे़ दरम्यान रुग्णांना दिवसेंदिवस ऑक्सिजनसह उपचार घेण्याची आवश्यकता वाढत आहे. आज ३ हजार १६ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: मंगळवारी १३ हजार ४३६ जणांची तपसणी केली़ शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ७२५ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिवसभरात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ८ जण पुण्याबाहेरील आहेत़ आज दिवसभरात रुग्णवाढीच्या तुलनेत जास्त म्हणजे ३ हजार २६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
शहरात आजपर्यंत १५ लाख १३ हजार ५८९ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी २ लाख ६४ हजार ८८५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख २६ हजार ८०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार २७०इतकी झाली आहे़