पुणे : शहरात सोमवारी गेल्या आठवड्याची तुलना करता ,कोरोनाबाधितांची वाढ निचांकी आढळून आली असली तरी, आज (मंगळवारी) पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे़ मंगळवारी ३७१ कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात २ हजार ९५१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे़
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील विविध विविध रूग्णांलयात ४०८ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २४२ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार १९५ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़
मंगळवारी ३४२ जण कोरोनामुक्त झाले. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ३९६ इतकी आहे़ दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, यातील १ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ४ हजार ४६७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत ८ लाख २२ हजार २५२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७० हजार ३५० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यातले १ लाख ६० हजार ४८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================