लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात शुक्रवारी नव्याने ५ हजार ३७३ कोरोनाबाधित आढळून आले असून, ५ हजार ४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २३ हजार ५६४ जणांनी कोरोना तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २२़ ८० टक्के आहे़
दरम्यान आज दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १४ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ६९ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ६३७ कोरोनाबाधित रूग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार १९६ रूग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत १८ लाख ३२ हजार १५७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ५४ हजार ७९७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी २ लाख ९४ हजार १७१ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५४ हजार ६२४ इतकी आहे़
-----------------------------------