पुणे : कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी राखीव खाटांची संख्या वाढविण्यास नकार देणाऱ्या शहरातील खाजगी रूग्णालयांनी, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंमलबजावणीच्या इशाऱ्यानंतर स्वत:हून वाढीव खाटा (बेड) देण्यास सुरूवात केली आहे़
मंगळवारी शहरातील लहान मोठ्या वीसहून अधिक रूग्णालयांनी स्वत:हून प्रत्येकी पाच, दहा वीसच्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी राखीव खाटा वाढविल्या आहेत़ यामुळे आज नव्याने शहरात दीडशे खाटांची वाढ झाली असून, यातील १०० खाटा या ऑक्सिजनसह आहेत़ तर ५० खाटा या आयसीयू व व्हेंटिलेटरच्या आहेत अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़मनिषा नाईक यांनी दिली़ दरम्यान ससून सर्वोपचार रूग्णालयातही आज कोरोनाबाधितांसाठी आणखी ८० खाटा राखीव केल्या आहेत़
---
आजपासून दोन सीसीसी कार्यरत
वाढत्या रूग्णसंख्येमुळे ज्यांना छोट्या घरांमुळे होम क्वारंटाईन (गृह विलगीकरण) होणे शक्य नाही़ अशा रूगणांकरिता आजपासून (दि.२४ मार्च) दोन कोव्हिड केअर सेंटर (सीसीसी) महापालिकेने सुरू केले आहेत़ यामध्ये हडपसर येथील ३०० बेडची क्षमता असलेली बनकर शाळा व येरवडा येथील ३०० बेडची क्षमता असलेले संत ज्ञानेश्वर सभागृह उपलब्ध करून दिले आहे़
पाच झोननिहाय सीसीसी कार्यरत होणा
आजपासून शहरातील सर्व प्रयोगशाळांना कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांची माहिती प्रथम महापालिकेला देण्याचे बंधनकारक केले आहे़ यामुळे संबंधित रूग्णास होम आयसोलेशनची सुविधा आहे की नाही याची चौकशी महापालिका करणार असून, तशी सुविधा नसल्यास त्यास महापालिकेच्या सीसीसीमध्ये संबधित क्षेत्रिय कार्यालयाकडून पाठविण्यात येणार आहे़ दरम्यान येत्या आठवड्यात शहरातील पाच झोननिहाय सीसीसी कार्यरत होणार असल्याची माहितीही महापालिकेकडून देण्यात आली़