ज्ञानेश्वर नागोजीराव वानखेडे (वय ३१, रा. मुऱ्हेवस्ती, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची वीस हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर (एमएच १४ /एचटी ८५७९) त्यांनी त्यांची दुचाकी आळंदी घाटात रस्त्याच्या कडेल लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी स्प्लेंडरचे कुलूप तोडून दुचाकी चोरून नेली आहे.
गणेश दशरथ ठाकूर (वय ३६, रा. कडाचीवाडी, सुखदेवनगर, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची वीस हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची पल्सर (एमएच १४ /एफबी ६२१९) ही दुचाकी घरासमोर पार्क केली असता कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.
गौतम जगदेवराव खंडारे (वय ४४, रा. ग्रामपंचायत शेजारी, खराबवाडी, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. खंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची बावीस हजार रुपये किमतीची लाल-पांढऱ्या रंगाची हिरोहोंडा स्प्लेंडर (एमएच १४ / केएफ ०१८३ ) महाळुंगे येथील एचपी चौकातील हॉटेल वैष्णवी समोरून समोर अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अधिक तपास करीत आहेत.