पुणे : आर्थिक मागास वर्गाच्या (ईबीसी) आर्थिक उत्पन्नात झालेली वाढ शिवसेनेमुळेच झाली असल्याचे सांगण्यात आले.फी भरण्याची ऐपत नसल्याने लाखो विद्यार्थी भरडले जात असल्याने शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ईबीसी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याची मागणी शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे केली होती. त्यानुसार शिवसेनेच्या ५ कॅबिनेट मंत्र्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीचे निवदेन दिले. त्यानंतर तासाभरातच फडणवीस यांनी ६ लाख उत्पन्न मर्यादा केल्याची घोषणा केली, असे शिवसेनेचे मराठवाड्यातील उपनेते तानाजीराव सावंत व पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.उपनेते शशिकांत सुतार, शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्यासह महादेव बाबर, सचिन तावरे, गजानन थरकुडे आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, ‘‘मराठा मोर्चे सुरू असताना दोन महिने या विषयावर हालचाली होत नसल्याने ठाकरे यांनी या विषयाला तोंड फोडले. या निर्णयाचे श्रेय मराठा क्रांती मोर्चालाही आहे.’’(प्रतिनिधी)
ईबीसीच्या मर्यादेत वाढ शिवसेनेमुळेच
By admin | Published: October 14, 2016 4:53 AM