वैशाली नागवडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. राज्य शासनाने मागील महिनाभरापूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयात राज्यातील ६५ हजार आशा सेविका व गतप्रवर्तक यांना मानधनात वाढ करण्याचे ठरविले होते. दि.१ जुलै २०२१ पासून आशा सेविकांच्या मानधनात हजार, तर गटप्रवर्तकांच्या मानधनात एक हजार दोनशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता. संबंधितांना ठरलेल्या तारखेनुसार मानधनात वाढ लवकरात लवकर लागू करावी अशी आग्रही मागणी वैशाली नागवडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
१९ यवत
राजेश टोपे यांना निवेदन देताना वैशाली नागवडे व इतर.
190821\img-20210818-wa0046.jpg
फोटो ओळ :- महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देताना पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे व इतर कार्यकर्ते