पुणे : शहरातील ओढे-नाले व मुळा-मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या जलपर्णीमुळे संपूर्ण शहरामध्येच डासांचा प्रार्दुभाव वाढला असून, नागरिक हैराण झाले आहे. यामुळे जलपर्णी काढण्याबरोबरच प्रशासनाने तातडीने फॉगिंग करण्याची मागणी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. गेल्या एक महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीमुळे सर्व पदाधिकारीस नगरसेवक व प्रशासन देखील लोकसभा निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त होते. परंतु मतदान झाल्यानंतर लगेचच सदस्य आणि प्रशासन कामाला लागले आहे. बुधवारी (दि.२४) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. यामध्ये नगररोड, चंदनगरस खराडी,वडगावशेरी, येरवडा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांत डांस मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे महेंद्र पठारे यांनी सांगितले. मुळा-मुठा नदीमध्ये वाढलेल्या प्रचंड जलपर्णीमुळे डांस वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नगररोड परिसरामध्ये डेंग्युचे रुग्ण वाढले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यानंतर इतर काही सदस्यांनी देखील आमच्या भागामध्ये डांस वाढले असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून, प्रशासनाने तातडीने उपाय-योजना करण्याची मागणी केली.दरम्यान, सध्या शहराच्या विविध भागामध्ये वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेच्या तीन-चार विभागांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. जलपर्णीचे वाढते प्रमाण लक्षात घेता यंत्रिकी पध्दतीने हे काम करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यानुसार नियोजन सुरु असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.---नियमित फॉगिंग सुरुशहरामध्ये काही भागामध्ये डांस वाढले आहेत हे खरे आहे. परंतु आरोग्य विभागाच्या वतीने नियमितपणे सर्वत्र फॉगिंग करण्यात येत आहे. डांसचे प्रमाण वाढल्याने काही भागात डेंग्युचे रुग्ण सापडत आहेत. परंतु आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारच्या उपाय-योजना सुरु आहेत. वाढत्या जलपर्णीमुळे डांसांचे प्रमाण वाढत असून, यावार देखील लवकरच तोडगा निघेल.-डॉ. रामचंद्र हंकारे, महापालिका आरोग्य विभाग प्रमुख
पुण्यात शहरामध्ये डास वाढल्याने पुणेकर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 8:00 AM
जलपर्णीमुळे संपूर्ण शहरामध्येच डासांचा प्रार्दुभाव वाढला असून, नागरिक हैराण झाले आहे.
ठळक मुद्देतातडीने फॉगिंग करण्याची सदस्यांची मागणीनगरसेवक व प्रशासन निवडणुक कामामध्ये व्यस्त