पुणे : एका बाजूला रेल्वेमधील सोयीसुविधांबाबत प्रवाशांची ओरड असतानाच दुसरीकडे विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे़. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २७ हजार ७३७ जणांना पकडण्यात आले आहे़. त्यांच्याकडून १ कोटी ७१ लाख ८ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे़ .पुणे विभागात पुणे - मळवळी, पुणे -बारामती, पुणे -मिरज आणि मिरज -कोल्हापूर या मार्गावर रेल्वे गेल्या दोन महिन्यात व्यापक प्रमाणावर तिकीट तपासणीची मोहीम हाती घेतली होती़. पुणे विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक मिलिंद देऊस्कर आणि अपर विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल चंदा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली होती़. एप्रिल व मे महिन्यात घेण्यात आलेल्या या मोहिमेत सर्व प्रकारचे तब्बल ६२ हजार ५२८ गैरप्रकार समोर आले़. त्यात एकूण ३ कोटी २७ लाख ७३ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला़.
विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 1:25 PM
एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २७ हजार ७३७ जणांना पकडण्यात आले आहे़.
ठळक मुद्देमोहिमेत सर्व प्रकारचे तब्बल ६२ हजार ५२८ गैरप्रकार समोररेल्वेची तपासणी मोहीम : १ कोटी ७१ लाखांचा दंड