जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारच्या निमित्ताने ७ हजारो ३४१ जुना व नवीन कांदा पिशव्यांची आवक होऊन कांदा नं. १गोळा कांद्यास १० किलोस ३८० रुपये ते ४२५ रुपये बाजारभाव मिळाला. रविवार पेक्षा नं. १ गोळा कांद्यास सरासरी ६५ रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड .संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
नवीन कांदा बाजारात प्रतवारीनुसार १० किलोचे बाजारभाव : कांदा नं १ (गोळा ) --३८० रुपये ते ४२५ रुपये .
कांदा नं २---३०० रुपये ते ३८० रुपये .
कांदा नं ३--( गोल्टा ) -२०० रुपये ते ३००रुपये .
कांदा नं ४( बलला ) -५० रुपये ते २००रुपये .
जुना कांदा :प्रतवारीनुसार १० किलोस १०० रुपये ते ३५० रुपये बाजारभाव मिळाला .
बटाटा बाजार :
गुरुवारी बटाटा बाजारात ३८३ बटाटा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस ५० रुपये ते १७१ रुपये
बाजारभाव मिळाला रविवारपेक्षा प्रतवारीनुसार ३१ रुपयांची बाजारभावात वाढ झाली आहे अशी माहिती ओतूर मार्केटचे कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.