पुणे : पहिल्या दोन टप्प्यात घसरलेल्या कोरोना लसीकरणाची टक्केवारी शुक्रवारी (दि. २२) वाढली असून ती साठ टक्के झाली. शहरातील सहा केंद्रांवर झालेल्या लसीकरणात नाव नोंदविलेल्या ६०० पैकी ३६० आरोग्य सेवकांनी लस घेतली.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, शहरात लसीकरण सुरु आहे. मात्र गेल्या यापुर्वीच्या दोन टप्प्यात अनुक्रमे ५५ आणि ३१ टक्के इतके कमी लसीकरण झाले होते.
आरोग्य सेवकांना लस प्राधान्याने देण्यात येत असली तरी ते घेण्याचे प्रमाण कमी असल्याने प्रशासनाने आरोग्य सेवकांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली. लसीकरण ऐच्छिक असल्याने टक्केवारी वाढविण्यात अडचणी होत्या. तांत्रिक अडचणींमुळेही लसीकरण होत नव्हते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी लसीकरणाचा टक्का वाढला.
चौकट
शुक्रवारचे लसीकरण
रुग्णालय उद्दिष्ट लसीकरण
जयाबाई सुतार दवाखाना १०० ९६
ृंराजीव गांधी रुग्णालय १०० ५१
कमला नेहरु रुग्णालय १०० ५५
ससून रुग्णालय (दोन केंद्र) २०० ७१
रुबी हॉल क्लिनिक १०० ८७