ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यातील मृत्यूदर तुलनेने कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. दि. १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान मृत्यूदर सुमारे चार टक्के होता. पुढील १५ दिवसांतील हे प्रमाण जवळपास दोन टक्क्यांनी वाढले. तुलनेने नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. पहिल्या १५ दिवसांत मृत्यूदर सुमारे साडे चार टक्के होता. पण एकूण मृत्यूदर अजून अडीच टक्क्यांच्या पुढेच आहे.
---------------
मागील काही दिवसांतील रुग्णस्थिती (कंसात टक्केवारी)
कालावधी चाचण्या बाधित रुग्ण मृत्यू
१ ते १५ ऑक्टोबर ५९ हजार ५४२ ९ हजार ८१७ (१६.४८) ३९२ (३.९९)
१५ ते ३१ ऑक्टोबर ४४ हजार ७२२ ५ हजार १९० (११.६०) ३०७ (५.९१)
१ ते १५ नोव्हेंबर २९ हजार ४८२ ३ हजार ३१ (१०.२८) १४१ (४.६५)
१५ ते १९ नोव्हेंबर ८ हजार २६१ १ हजार ९५ (१३.२५) २२ (२)
---------------------------------------------------------------------
चौकट
९ मार्च ते २० नोव्हेंबर कालावधीतल्या चाचण्या
एकुण ७ लाख ७७ हजार २०८
कोरोना बाधित १ लाख ६५ हजार ८३७ (२१.३३)
कोरोना मृत्यू ४ हजार ४०७ (२.६५)
------