पुणे शहरात लॅाकडाउन नको तर निर्बॅध कडक करा अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. जमावबंदीची वेळ अलिकडे आणा पण पुर्ण लॅाकडाउन नको अशी भुमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कौन्सिल हॉल येथे सुरू आहे. बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
या बैठकी दरम्यान खासदार गिरीश बापट म्हणाले ,” बैठका घेता.. चांगला परिणाम होतो... ससून मध्ये मृत्युचे प्रमाण अधिक का.. अनावश्यक फिरणा-याची संख्या अधिक.... लोकप्रतिनिधींनी काय केले पाहिजे... पोलीस गेले की लोक परत गर्दी करतात... लोकप्रतिनिधींकडून जनजागृती केली पाहिजे... लसीकरण वाढवले पाहिजे... कडक निर्बंध केले पाहिजे... डाॅक्टर, नर्स कमी पडत आहेत.. तरुणांमध्ये संसर्ग वाढत आहे”
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या ,” प्रशासनाची भूमिका लाॅकडाऊन करा अशी असली तरी.. लोकांना लाॅकडाऊन नको... निर्बंध कडक करा.काही हाॅस्पिटल शंभर टक्के कोविडसाठी घ्या..दिव्यांग मुलांच्या लसीकरणाचा शासनाने निर्णय घ्यावा.फेसबुक पेज, सोशल मिडीयावर प्रचार प्रसिद्ध करा... लोकप्रतिनिधी पर्यंत माहिती मिळत नाही.. लोकांना लाॅकडाऊन नको,पण निर्बंध पाळत नाही.सहा पर्यंत हाॅटेल,रेस्टॉरंट बंद ठेवणे चुकीचे होईल.”
खासदार अमोल कोल्हे म्हणाले” अमोल कोल्हे : लाॅकडाऊन करून काही ही उपयोग होणार नाही. मृत्यूदर कमी करणे, या साठी काय करू शकतो..प्रसार कमी करण्यासाठी याचा विचार केला पाहिजे.रुग्ण किती.उपलब्ध ऑक्सिजन बेड किती ताळमेळ बसत नाही..काॅन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही.वरळी पॅटर्न राबवा.होम आयसोलेशन असलेल्या सर्वांना निर्बंध अधिक कडक केले पाहिजेत. औद्यागिक क्षेत्रात.डोअर्स स्टेप लसीकरण केले पाहिजे. स्टेप डाऊन प्रोटोकॉल डेथ रेट कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. व्हेंटिलेटर बेड वाढवले पाहिजेत .9 तारखेला दिल्लीत बैठक.”
अजित पवार म्हणाले "मी पण लॉकडाऊन च्या विरोधात आहे... पण संख्या ज्या पध्दतीने वाढते..त्या पद्धतीने शंभर टक्के हाॅस्पिटल ताब्यात घेतले तरी बेड मिळने कठीण आहे. लोक ऐकतच नाहीत... कडक निर्बंध घातले तरी.. पोलिस, आयुक्त निर्बंध पडतात...एखाद्या घरात कोरोना रूग्ण असेल तरी.. त्या घरातील इतर लोक गाव भर फिरातात.. काही उपयोग होत नाही.... संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही... त्या वेळी काय करणार? निर्बंध खूप कडक करा खूप कडक करा असे सर्वच म्हणतात.. नक्की काय करायचे?"
विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले" लाॅकडाऊन नको या भावना ठिक आहे.पण संख्या लक्षात घेता. बेड उपलब्ध करुन देणे भविष्यात कठीण होईल... संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काही तरी कडक निर्बंध घालावेच लागेल... गेल्या एक महिन्यांपासून निर्बंध हळूहळू वाढवले... पण फरक नाही पडला.. आता कडक निर्णय घ्यावा लागेल..सिनेमागृह पूर्ण पणे बंद ठेवा. अत्यावश्यक दुकाने सोडून.. अन्य सर्व दुकाने बंद करावेच लागेल.सामाजिक भावनाचा आम्हाला कदर... दहा दिवस तरी बंद करा."