--
चौकट
३० ते ७० हजार रुपयांना गायींची विक्री
१९९६ सालापासून दर गुरुवारी भरणारा हा संकरित गाईंचा बाजार तेजी मंदीचा सामना करत आजही भरत आहे. पावसाने चारा व पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाल्याने शेतकरीवर्ग गाई खरेदीसाठी आज मोठ्या संख्येने आले होते. विशेषतः संकरित गाईंच्या कालवडींची खरेदीही शेतकरीवर्गाकडून चांगल्या प्रमाणात झाली. यामुळे येथील बाजारात खरेदी विक्री व्यवहारात चांगली आर्थिक उलाढाल झाली. प्रतवारीप्रमाणे प्रत्येकी ३० ते ७० हजार रुपयांपर्यंत आज संकरित गाईंची विक्री झाली असल्याचे सभापती संजय काळे उपसभापती दिलीप डुंबरे यांनी सांगितले तर जवळपास २७५ संकरित गाई येथे विक्रीस आल्या असल्याचे सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमुख प्रशांत यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक ३० आळेफाटा संकरीत गाई
फोटो ओळी : आळेफाटा येथील भरलेला गुरुवारचा संकरित गाईंचा आठवडे बाजार.