भोर तालुका दुर्गम डोंगरी असल्याने दर वर्षी माॅन्सूनची सुरुवात अतिवृष्टीने होते. मात्र, यंदा माॅन्सूनने संथगतीने सुरुवात केल्याने तालुक्यातील शेती, घरांचे नुकसान झाले नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात माॅन्सून वेळेत सुरू झाल्याने शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. खरिपातील पिकांची बहुतांशी पेरणी पूर्ण झाली आहे. तर, खरीप पिकांची उगवनही चांगली झाल्याने पिके जोमात आहेत. सध्या दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीने भाटघर व नीरा-देवघर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. भाटघर धरण क्षेत्रात १९१, नीरा-देवघर धरणाच्या परिसरात ४५८, तर वीर धरणक्षेत्रात १५८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दोन्ही धरणांत सध्या तीन टीएमसी पाणीसाठा असून, धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. माॅन्सूनच्या पावसामुळे पूर्णतः तालुक्यात पाणीपातळीत वाढ होत चालली आहे.
फोटो : भाटघर धरण