शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

मावळात जमिनींच्या खरेदी विक्री, दाखल्यांसाठी वाढली लाचखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 2:42 PM

जमिनींना सोन्याचे दर...

ठळक मुद्देमावळ तालुक्यात १०३ ग्रामपंचायती आहेत. तर दोन नगरपालिका तर एक नगरपंचायततालुक्यात तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयात कामानुसार दर निश्चित काही लोकप्रतिनिधी ठेकेदारांकडून सर्रास पैसे घेऊ लागल्याने ठेकेदारही हतबलकाही अधिकारी व कर्मचारी जमिनींचे व्यवहार करून कोट्यधीश

वडगाव मावळ : पुणे-मुंबईचा दुवा असलेल्या मावळ तालुक्यातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे धनिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. त्यातून मोठ मोठे गृहप्रकल्प उभे राहू लागले आहेत. त्यामुळे खरेदी-विक्री, ना हरकत दाखले, उताऱ्यावर नावांची नोंद करणे, जमिनीची सीमा निश्चित करणे, वीज जोडणी आदी अशा विविध कारणांसाठी महसूल, विद्युत, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद, पोलीस,  दुय्यम निबंधक, बांधकाम व इतर शासकीय खात्यात एक हजारांपासून लाखो रुपयांची लाच घेतली जात असल्याचे चित्र मावळात सुरू आहे.चार दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक वस्तूचे बील काढण्यासाठी साडेसात हजारांची लाच घेताना एका ग्रामसेवकाला व लोकप्रतिनिधीला अटक केली. गेल्या वर्षी ११ लाख रुपयांची लाच घेताना वनपालास अटक केली. सहा हजरांची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक केली. दस्त नोंदणीसाठी आठ हजार घेताना दुय्यम निबंधकाला पकडले. ठेकेदाराकडून महावितरण अभियंत्यावर कारवाई झाली. ४० हजारांची लाच घेताना एका ग्रामसेवकाला पकडले. याशिवाय काही तलाठी, मंडलाधिकारी लाच प्रकरणात सापडले. त्यानंतर ग्रामसेवक व शिपाई आत्ता ग्रामसेवक व सरपंचाला पकडले. मावळ तालुक्यात १०३ ग्रामपंचायती आहेत. तर दोन नगरपालिका तर एक नगरपंचायत आहे. या हद्दीत विविध गृहप्रकल्प, प्लॉटींग व इतर कामे चालू आहेत. या कामांसाठी ना हरकत दाखल्याची आवश्यकता असते. ते देण्यासाठी काही ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, लिपिक यांनी दर ठरवले आहेत. बाहेरील व्यावसायिकांपेक्षा स्थानिकांकडून कमी रक्कम घेतली जाते. तसेच किमती वस्तूंच्या स्वरूपातही लाच स्वीकारली जात आहे. तालुक्यात तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयात कामानुसार दर निश्चित केले आहेत. सातबारा उतारा, फेरफार, वारस, खरेदी नोंदी यासाठी क्षेत्रानुसार व तेथील जमिनीच्या दरानुसार रक्कम घेतली जाते. अनेक शासकीय कार्यालयात खासगी मदतनीस ठेवले आहेत. त्यांच्यामार्फत ही रक्कम घेतली जाते. नगरपालिका, नगरपंचायत हद्दीत बांधकाम आराखडा मंजूर करण्यासाठी अधिकारी लाखो रुपये घेतात. ते न दिल्यास काहीतरी बाब सांगून आराखडा मंजूर करत नाही. तालुक्याचे वडगाव हे मुख्य केंद्र असून सर्व शासकीय कार्यालय आहेत. परंतु अनेक ठिकाणी लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही लोकप्रतिनिधी ठेकेदारांकडून सर्रास पैसे घेऊ लागल्याने ठेकेदारही हतबल झाले आहेत. ...........अधिकारी झाले कोट्यधीशकाही अधिकारी व कर्मचारी जमिनींचे व्यवहार करून कोट्यधीश झाले आहेत. तर काही पोलीस अधिकाºयांनी जमिनींच्या ‘मॅटर’ची ‘सुपारी’ घेऊनच बक्कळ कमाई करून गडगंज झाले आहेत. मावळ तालुका हा सोन्याचे अंडे देणारा तालुका असल्याने शासकीय अधिकारी पुन्हा मावळात येण्यासाठी इच्छुक झाले आहेत.............नागरिकांनी कोणालाही लाच देऊ नये. तसे करणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच कोणी लाच मागत असल्यास त्याबाबत तक्रार करावी. शासकीय सेवेत असलेल्या लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा. - राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, पुणे...........

टॅग्स :mavalमावळCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिसgram panchayatग्राम पंचायतFarmerशेतकरी