मनोहर बोडखे - दौैंड : दौैंड तालुक्यात चौैफेर वाळूउपसा सुरू आहे. या वाळूउपशातूनगुन्हेगारी वाढली आहे. वाळूमाफियांकडे असलेली बेकायदेशीर हत्यारे, गावठी कट्टे यांचा सर्रासपणे वापर झाला असल्याची वस्तुस्थिती आहे. तालुक्यात काही ठिकाणी वाळूमाफियांमध्ये आपापसांत झालेल्या भांडणातून गोळीबार झाला आणि त्यातून काही व्यक्ती मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्याचे तालुक्यातील वास्तव चित्र आहे.वाळूमाफियांची कसून चौकशी केली, तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रसाठा सापडू शकतो. बºयाच ठिकाणी वाळूउपसा करण्यासाठी बिहारचे मजूर बोलवले जातात. या मजुरांना दारू पाजून त्यांच्याकडून वाळूउपसा केला जातो. बिहारचे हे मजूर येताना गावठी बंदुकीचे कट्टे घेऊन येतात आणि ते वाळूमाफियांकडे दिले जातात. परिणामी, शेतकरी, महसूल अधिकारी आणि वाळू व्यवसायात कोणी आडवा येत असेल तर त्याच्यावर दहशत केली जाते. सध्या थंडीचे दिवस असल्याने रात्रीच्या वेळी महसूल पथक कार्यरत नाही, त्यामुळे वाळूमाफियांना रात्री वाळूचे मोकळे कुरण सापडले आहे. त्यामुळे रात्रभर बिनदिक्कत वाळूउपसा केला जातो. .............पोलीस प्रशासनाने वाळू माफियांची चौकशी करून त्यांच्याकडे असलेली बेकायदेशीर हत्यारे जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. दिवसा आणि रात्री महसूल आणि पोलिसांनी चेकनाके सुरू केले तर वाळूवाहतुकीस आळा बसू शकतो. हे चेकनाके कासुर्डी टोलनाका, राहू, लिंगाळी, खोरवडी रेल्वेगेट, खडकी, सोनवडी, पाटस, पडवी यासह अन्य ठिकाणी कायमस्वरुपी चेकनाके सुरू करावेत की जेणेकरून शासनाचा महसूल बुडणार नाही..........वाळूउपसा करून त्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी वनखात्याच्या जमिनीचा वापर केला जात असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. सध्याच्या परिस्थितीत कानगाव (ता. दौंड) येथे वनखात्याच्या हद्दीत एक ट्रक, एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रॅक्टर ट्राल्या यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे गस्त पथक वाढविले असून, वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यास वनखाते सज्ज आहे.- महादेव हजारे, वनपरिक्षेत्र अधिकारी, दौंड...........कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणी बेकायदेशीर हत्यारे वापरत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ज्या कोणा व्यक्तीकडे बेकायदेशीर हत्यारे आहेत अशी माहिती कोणाकडे असेल, तर त्यांनी पोलिसांना कळवावे. त्याचे नाव गुप्त ठेवून कडक कारवाई केली जाईल. तसेच सध्याच्या परिस्थितीत पोलीस सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे. - सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक, दौंड....................वाळूचे सातत्याने होणाऱ्या उत्खननामुळे वनसंपदा आणि तेथील सजीवांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय, वाळूच्या अवजड वाहतुकीमुळे गावातील व वनपरिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ...........वाळूमाफियांवर कोणाचाच वचक नसल्यामुळे वाळूमाफियांची मुजोरी वाढतच चालली आहे. वाळूउपशाचा सर्वाधिक त्रास वाळूउपसा होणाºया गावातील ग्रामस्थांना होतो. मात्र, त्यांच्यावर असलेली वाळूमाफियांच दहशत इतकी प्रचंड आहे की, वाळूमाफियांची तक्रार करण्यास कोणीच धजावत नाही. त्यापलीकडे शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारीसुध्दा एकट्याने वाळूचा ट्रक अडविण्याचे धैर्य दाखवत नाही.
वाळूमाफियांच्या बेकायदेशीर हत्यारांतून वाढली गुन्हेगारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 2:57 PM
वाळूचे सातत्याने होणाऱ्या उत्खननामुळे वनसंपदा आणि तेथील सजीवांना धोका निर्माण
ठळक मुद्देशस्त्रांचा दाखविला जातो धाक : शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांमध्ये वाढवाळूच्या अवजड वाहतुकीमुळे गावातील व वनपरिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्थावाळूमाफियांवर कोणाचाच वचक नसल्यामुळे वाळूमाफियांची मुजोरी