पुणे : पोलीस ठाण्यात नियमितपणे असंख्य प्रकारेचे अर्ज येत असतात़ अनेक गुन्ह्यांचा तपास न झाल्यास ते तसेच प्रलंबित असतात़ आरोपींना तसेच साक्षीदारांना समन्स बजावण्याचे कामही पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर असते़ कामाच्या धबडग्यामध्ये अनेकदा असंख्य बाबी या प्रलंबित पडत जातात़ त्याचा आता साप्ताहिक आढावा दर मंगळवारी घेतला जात असल्याने पोलिसांच्या कामावर त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे़ त्यामुळे एक वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेले गुन्हे निकाली करण्याचा वेग वाढला असून गेल्या तीन महिन्यांत निम्मे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
विविध प्रकारचे अर्ज, प्रलंबित गुन्हे यांची संपूर्ण आयुक्तालयाची एकत्रित यादी करण्यात आली़ हे अर्ज व प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याची लाईन आॅफ अॅक्शन ठरवून देण्यात आली़ गेल्या तीन महिन्यांत जवळपास निम्मे अर्ज व प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यात यश मिळाले आहे़ याबरोबर आरोपींना समन्स बजावणे, मुद्देमालाची तपासणी, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, अशी अनेक कामे दर आठवड्याला होऊ लागली़ त्याच्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांचे सुपरव्हिजन नियमितपणे सुरू झाले़ त्याचा परिणाम आता तीन महिन्यांनंतर दिसू लागला आहे़रेकॉर्डवरील आरोपी आता नियमितपणे बीट मार्शलकडून होऊ लागल्याने आपल्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार कोण कोण आहेत, याची माहिती केवळ तपास पथकापुरती न राहता संपूर्ण पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना झाली़ त्याचे रेकॉर्ड दर आठवड्याला अपडेट होऊ लागले़पोलीस ठाण्याचे रेकॉर्ड दर आठवड्याला अपडेट होऊलागल्याने गुन्ह्याचा कल लक्षात येऊ लागला़न्यायालयातील हजेरी वाढलीच्समन्स बजावण्याचे काम आता ९० टक्क्यांपर्यंत होऊ लागले़ त्यामुळे न्यायालयातील खटल्यांमध्ये हजर राहण्याच्या प्रमाणावर वाढ झाली आहे़च्एका वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेले गुन्हे ७११ होते़ आता तीन महिन्यांनंतर २०१ गुन्ह्यांपर्यंत ते खाली आले आहे़ तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ५ हजारांहून अधिक विविध अर्ज प्रलंबित होते़ त्यापैकी २ हजार ४३४ अर्ज निर्गती करण्यात येऊन तशी माहिती अर्जदारांना देण्यात आली आहे़च्दर आठवड्याला गुन्ह्यांची माहिती घेतली जात असल्याने वरिष्ठ अधिकाºयांनाही शहरात घडणाºया गुन्ह्यांची बारकाईने माहिती होऊ लागली आहे़ त्यानुसार तपासासंदर्भात संबंधितांना वरिष्ठ अधिकाºयांकडून मार्गदर्शन केले जाऊ लागले आहे़च्दर आठवड्याच्या बैठकीमुळे काही जणांना याचा त्रास वाटत असला तरी त्यातून चांगले परिणाम दिसू लागले असून ही बैठक दोन तास चालत असल्याने आढावा घेण्यासाठी आठवड्यातून इतका वेळ देणे सर्वांना शक्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले़