शहरं
Join us  
Trending Stories
1
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या अन्यथा आगामी निवडणूकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
4
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
5
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
6
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
7
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
8
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
9
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
10
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
11
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
12
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
13
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
14
'सुपरस्टार'चा सन्मान! ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
15
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
16
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
17
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
18
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
19
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
20
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल

लसीकरणानंतरही कोरोना संसर्ग होण्याच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस दलातील ८० टक्क्यांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा पहिला डोस दिला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील ८० टक्क्यांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा पहिला डोस दिला आहे़ त्यांच्यातील ३५ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे़ असे असताना आता आलेल्या दुसऱ्या लाटेत पहिला डोस घेतलेल्या अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहर पोलीस दलाने आता पहिल्या लॉकडाऊनच्या काळात ज्या पद्धतीने पोलिसांसाठी उपाययोजना राबविल्या होत्या. त्या पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.

सोमवारी एकाच दिवशी ३ अधिकारी आणि २९ अंमलदार यांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. पुणे शहर पोलीस दलातील २८१ पोलीस अधिकारी व कर्मचारी सध्या कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात ३० पोलीस अधिकारी असून २५१ पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर आतापर्यंत शहरातील १ हजार ९७१ जणांना लागण झाली असून, त्यांच्यापैकी १ हजार ७१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चालू आठवड्यात ७४ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

याबाबत अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले की, शहर पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले असून, जवळपास ३० टक्के पोलिसांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पोलीस दलात कोरोनाबाधित होणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून आले. त्यामुळे सर्वांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे सुरक्षाविषयक उपाययोजना आखण्यात आल्या होत्या, त्या पुन्हा सुरु केल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात वेलनेस ऑफिसरची नेमणूक केली आहे. पोलीस ठाणे व विविध पोलीस कार्यालयांना मास्क, सॅनिटायझर पुरविणे़, बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विलगीकरण कक्षात राखीव बेड ठेवणे, तेथे त्यांना जागा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे.

.........

१८ एप्रिलपर्यंतची स्थिती

उपचार घेत असलेले एकूण पोलीस - २४२ (२७ अधिकारी, २२२ अंमलदार)

एकूण बरे झालेले - १७१६

मृत्यू - १३

एकूण बाधित १९७१

एकूण हजर पोलीस - ७४४ अधिकारी, ७९०० अंमलदार

पहिला डोस घेतलेले - ७०२९ (५९८ अधिकारी, ६४३१ अंमलदार)

दुसरा डोस घेतलेले - ३११९ (२१४ अधिकारी, २९०५ अंमलदार)

एकूण बाधित कुटुंबीयांची संख्या - ४४६२

बाधित कुटुंबीयांची संख्या - ५४९