भोर : विविध कारणांसाठी डोंगरात होत असलेले उत्खनन, दरवर्षी वाढत जाणारी वृक्षतोड, पाणी आडवा पाणी जिरवायला काढलाले सलग समतर चर, नाचणीच्या शेतीसाठी डोंगरात वृक्षतोड, उन्हाळ्यात जंगलांना लागणारे वनवे या सारख्या आदी कारणांममुळे डोंगराचा भाग ठिसूळ होऊन दरडी पडण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे डोंगर दऱ्यातील नागरीक आपला जीव मुठीत धरुन राहावे लागत आहे. अशा लोकांचे सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन होणे गरजेचे आहे. तसेच डोंगर पोखरणाऱ्यांवर कारवाई करणे महत्त्वाचे आहे.
भोर तालुक्यात दुर्गम डोंगरी भागात जमिनी खरेदी करणारे डोंगरावर घरे बांधुन त्यासाठी जमिन खोदुन रस्ते तयार करतात.
यावेळी मोठया प्रमाणात डोंगरात उत्खन्न केले जाते. झाडांची कत्तल हाते. यामुळे पावसाळयात उकरलेली माती आणि झाडे झुडपे वाहुन खाली येतात. त्याचबरोबर शासनाच्या पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी कृषी विभागाने काढलेले सलग समतर चर, डोंगर उतारावर पाणी साचण्याऐवजी डोंगराला काढलेल्या चरांना एक फुट लांब आणि दोनशे ते तीनशे फुट लांब भेगा पडतात. यात पावसाळयात पाणी शिरुन डोंगर ढासळत आहेत. जंगलातील वृक्षतोड करुन डोगर उतारावर झाडे तोडून नाचणीची शेती केली जात आहे. यामुळेही जमिनीची धुप होत आहे. रस्त्याची कामे करताना दगडासाठी डोंगर पोखरले जात आहेत. यासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे जमिन हादरुन ठिसुळ होत आहे. यामुळेही डोंगर ठिसूळ होत असून दरडी कोसळण्याच्या घटना वाढत आहे. भोर तालुक्यात विविध कारणांसाठी ज्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. मात्र, त्या प्रमाणात पुन्हा वृक्ष लागवड होत नाही. यामुळे दिवसेंदिवस जंगले कमी होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होऊन जमिनीची धुप वाढत आहे. डोंगराचा भाग ढिसुळ होऊन पाण्याच्या प्रवाहा बरोबर झाडेझुपडे जमिनीतील माती वाहुन येण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे डोंगर दऱ्यातील मानवी वस्त्यावर दरडी पडुन जीवितहानी होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे डोंगर दऱ्यात राहणारे लोकांना जीव मुठीत धरुन राहावे लागत आहे.
साळुगण ता भोर येथील डोंगर खाली आलेला व इतर फोटो