शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

मावळात नवमतदार नोंदणीत युवक-युवतींचा वाढला टक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 12:19 AM

निवडणूक विभाग : ६४ हजार नवमतदारांची नोंदणी, एकूण २२ लाख २७ हजार मतदार

पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना जारी केल्यानंतर निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध केली. ३१ मार्च अखेर नवमतदारांची नोंदणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये ३३,१६० युवतींची नोंदणी झाली आहे. तर, ३१,२५१ पुरुष व युवक नवमतदारांनी नोंदणी झाली. त्यानुसार पुरवणी मतदार यादीतून एकूण ६४,४११ नवमतदारांची नोंदणी झाल्याने मावळ मतदार संघातील एकूण मतदारांची संख्या २२ लाख २७ हजार ६३३ मतदारसंख्या झाली आहे.

पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागलेल्या मावळ मतदारसंघाचे क्षेत्रफळ अतिशय विस्तीर्ण आहे. या मतदारासंघात विधानसभेच्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात पनवेल विधानसभा मतदारसंघ मोठा असून, येथे ५ लाख १४ हजार ९०२ मतदार आहेत. तर कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी मतदार आहेत. २ लाख ७५ हजार ४८० इतकी कर्जतची मतदारसंख्या आहे.मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील चिंचवड, पिंपरी, मावळ विधानसभा मतदारसंघ तर घाटाखालील पनवेल, कर्जत व उरण या सहा विधासभा मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीत घाटाखालील मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे उमेदवारांना घाटाखालील भागातही मोठ्या प्रमाणात प्रचार करावा लागणार आहे. या मतदारसंघात पनवेलच्या खालोखाल चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो. चिंचवडमध्ये ४ लाख ७६ हजार ७८० मतदार आहेत.

चिंचवडला सर्वाधिक २७ तृतीयपंथी मतदारमावळ लोकसभा मतदारसंघात ३२ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक चिंचवडमध्ये तृतीयपंथी मतदार आहेत. २७ तृतीयपंथी मतदारांची चिंचवडला नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल पिंपरीत ४ आणि उरणला केवळ एक तृतीयपंथी मतदाराची नोंद झाली. पनवेल, कर्जत आणि मावळ या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये तृतीयपंथी एकही मतदार नाही.मतदारसंख्येत २ लाख ७३ हजारांनी वाढमावळ लोकसभेमध्ये २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १९ लाख ५३ हजार ७३१ मतदार होते. त्यापैकी ११ लाख ७३ हजार ९४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०१४ मध्ये मावळात ६० टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये २०१४ च्या तुलनेत २ लाख ७३ हजार ९०२ मतदार वाढले आहेत. यात महिलांची संख्या अधिक असून १ लाख ४३ हजार ५५९ महिला मतदार वाढल्या आहेत. तर, १ लाख ३० हजार ३११ पुरुष मतदार वाढले आहे. या वेळी ११ लाख ६६ हजार २७२ पुरुष, तर १० लाख ६१ हजार ३२९ महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्यापनवेल : ५,१४,९०२कर्जत : २,७५,४८०उरण : २,८६,६५८मावळ : ३,३२,११२चिंचवड : ४,७६,७८०पिंपरी : ३,४१,७०१एकूण : २२,२७,६३३

टॅग्स :maval-pcमावळmavalमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक