शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जिल्ह्यात वाढली टंचाईची दाहकता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 2:42 AM

एकूण ३८ टँकरनी पाणीपुरवठा : बारामतीत १५, तर शिरूरमध्ये ११ टँकर, पुणे विभागातील १०० गावांत १०० टँकर

पुणे : दुष्काळाची दाहकता वाढू लागली असून, पुणे विभागातील १०० दुष्काळी गावांमध्ये १०० टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात सर्वाधिक ३१, तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १५ आणि शिरूरमध्ये ११ टँकर सुरू आहेत. विभागातील १ लाख ८२ हजार २६० नागरिक दुष्काळाने बाधित असून, बाधित जनावरांची संख्या १९ हजार ९०१ आहे. पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या ३० वरून ३८ झाली आहे.पुणे विभागातील सातारा, सांगली, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत चालली आहे. विभागात ६ डिसेंबर रोजी ९१ टँकर सुरू होते, तर १० डिसेंबर रोजी टँकरची संख्या १०० वर गेली. सध्या १०० गावे आणि ६७६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. साताऱ्यात ३९, पुण्यात ३८, सांगलीत १८ आणि सोलापूर जिल्ह्यात ५ टँकर सुरू आहेत.पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात माणमध्ये ३१, खटावमध्ये ५ तर कोरेगावमध्ये १ आणि फलटण येथे २ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेक गावांत तसेच वाड्यावस्त्यांत पाण्याची कायमस्वरूपी सोय नसल्याने टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात जवळपास सहा तालुक्यांतील २५ गावे आणि २७१ वाड्यावस्त्यांमधील ७२ हजार ९५९ गावांना ३८ टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता वाढली आहे.भविष्यात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जवळपास १२ गावे तसेच १३१ वाड्यावस्त्यांवर १५ टँकरनी पाणीपुरवठा सध्याच्या स्थितीत सुरू आहे. बारामातीपाठोपाठ शिरूरमध्ये सर्वाधिक ११ टँकर सुरू आहेत. शिरूर तालुक्यातील ५ गावे आणि ४६ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवले जात आहे.दौंड तालुक्यातील ७ गावे आणि ६३ वाड्यावस्त्यांसाठी ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत. तसेच, पुरंदर व जुन्नरमध्ये प्रत्येकी २ आणि आंबेगावमध्ये १ असे एकूण ३८ टँकर सुरू आहेत. सांगलीत खानापूर येथे ३, आटपाडीत ८, जतमध्ये ४, कवठे महांकाळ येथे २ आणि तासगाव येथे १ टँकर सुरू आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्यात माढा येथे ३ आणि करमाळा तालुक्यात २ टँकर सुरू आहेत.जिल्ह्यात धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे जवळपास भरली. मात्र, शेतीसाठी आवश्यक असा पाऊस न झाल्याने आजही अनेक तालुक्यांतील नद्या तसेच तलाव कोरडे पडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळाची दाहकता वाढली आहे. राज्यभरात प्रशासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. सुरुवातीला ९ टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यात वाढ झाली असून ही संख्या ३८वर पोहोचली आहे.जिल्ह्यात ७२ हजार ९५९ नागरिकांची तहान टँकरवरपुणे जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. जवळपास ६ तालुक्यांतील २५ गावे आणि २७१ वाड्यावस्त्यांवरील ७२ हजार ९५९ नागरिकांची तहान ही टँकरच्या पाण्याने भागवली जात आहे. डिसेंबर महिन्यातच ही स्थिती असल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे