शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; पुण्यात विसर्जन मिरवणूक रखडली
2
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
3
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
4
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
5
ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका
6
देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय
7
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
8
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
9
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
10
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
11
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
12
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
13
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
14
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
15
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
16
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
17
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
18
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
19
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
20
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव

आढाव यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा

By admin | Published: October 07, 2016 2:54 AM

शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना

पुणे : शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांबरोबरच श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन यांच्या वतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला. शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, या मागण्यांसाठी डॉ. आढाव यांनी २ आॅक्टोबरपासून गुलटेकडी, मार्केट यार्ड कार्यालय येथे उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी उपोषणस्थळी डॉ. आढाव यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत म. वि. अकोलकर, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, अशोक राठी, प्रमोद राणी आदी उपस्थित होते. उपोषणाला पाठिंबा म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आपण स्वत: शुक्रवारी दुपारी उपोषणात सहभागी होणार आहे, असे खासदार चव्हाण यांनी डॉ. आढाव यांनी सांगितले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनीही डॉ. आढाव यांची भेट घेतली व उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. राज्य सरकारने शेतीमाल विक्रीसाठी संघटित व्यवस्था तयार करावी, शेतीमाला हमीभाव देण्यासाठी हमीफंड तयार करावा, अशा मागण्या पक्षाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. अजित दरेकर, विलास वाडेकर, राजूशेठ डांगी, रमेश अय्यर, नीलेश बोराटे, द. स. पोळेकर, अनिल आवटी आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. मनसेच्या राज्य परिवहन कामगार सेनेच्या वतीने जयराज लांडगे यांनीही डॉ. आढाव यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या समवेत गणेश खाडे, सनी जगताप, सागर भिसे, गणेश पासलकर, अमर नाईक, कुशल शिंदे, सचिन नागरे, नागेश मलठणकर, सागर राठोड आदी त्यांच्यासमवेत होते. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली भेट : मागण्यांना पाठिंबा४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आढाव यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असून, त्यांचा संदेश घेऊन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे व इतर प्रमुख काँग्रेस नेत्यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली.४ या नेत्यांनी बाबा आढाव यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले.४या शिष्टमंडळात आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, नगरसेवक अभय छाजेड, संजय बालगुडे, आबा बागुल यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.