Indapur Assembly Election 2024: इंदापूर विधानसभेतून अजित पवार गटाचे दत्ता भरणे केवळ ३३६ मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:23 AM2024-11-23T09:23:45+5:302024-11-23T09:24:27+5:30
Indapur Assembly Election 2024 इंदापूर विधानसभेत दोन राष्ट्रवादीची लढत होत असून अपक्ष उमेदवार मानेही मैदानात उतरले आहेत
Indapur Assembly Election 2024 : इंदापूरच्या तिरंगी लढतीत पहिल्या फेरी अखेर दत्ता भरणे हे ३३६ मतांनी आघाडीवर आहेत. या लक्षवेधी निवडणुकीत पाटील पहिल्या फेरीअखेर पिछाडीवर राहिले आहेत. इंदापूरात तिरंगी लढत होत आहे. भरणे यांना ४८६६, पाटलांना ४५३० आणि प्रवीण मानेयांना १२५० मतं मिळाली आहेत. अजूनही आघाडी बदलण्याची शक्यता आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान झाले आहे. ३ लाख ४१ हजार ४८५ मतदारांपैकी २ लाख ५९ हजार ८७१ मतदारांनी मतदान केले आहे. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत ०.२४ टक्क्यांनी ‘टक्का’ घसरला असला तरी निवडून येणारा उमेदवार दोन ते तीन हजारांच्या मताधिक्यानेच निवडून येईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार अमोल मिटकरी यांनी, तर हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी सभा घेतल्या. अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी प्रचाराच्या सुरुवातीपासून मतदार हाच आपला स्टार प्रचारक समजून मोठ्या सभा टाळत, घोंगडी बैठका, कोपरा सभा घेण्यावर लक्ष केंद्रित केले. आवश्यक तेथे मोठ्या जाहीर सभा घेतल्या आहेत.