"विरोधी गटाचा आमदार असलो तरी मी एवढा सोप्पा नाही, पवारांचा पठ्ठ्या आहे"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 04:38 PM2023-01-09T16:38:06+5:302023-01-09T16:49:36+5:30
आगामी काळातही तालुक्याच्या विकासाचा ओघ कायम राहील...
इंदापूर (पुणे) : जरी विरोधी गटाचा आमदार असलो तरी मी एवढा सोपा नाही. पवारांचा पठ्ठ्या आहे. कोठून विकास निधी आणायचा हे मला माहिती आहे, अशा शब्दांत आगामी काळातही तालुक्याच्या विकासाचा ओघ कायम राहील, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री आ. दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शहरातील बाब्रस मळा भागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, जाहिरातबाजी करून निव्वळ गप्पा मारून लोकांचे प्रश्न सुटत नसतात. गप्पा मारणारांना गप्पा मारू द्या. आपण काम करू. बाकीच्या लोकांसारखा हा आमदार झोपलेला नाही. कोठून विकास निधी आणायचा हे मला माहिती आहे. लवकरच नवीन विकासकामांच्या संदर्भातील यादी ऐकायला मिळेल.
श्रीधर बाब्रस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अरविंद वाघ, धनंजय बाब्रस, सुरेश गवळी, विनायक बाब्रस, बाळासाहेब व्यवहारे, राजेंद्र चौगुले, पोपट शिंदे, एकनाथराव गारदी, निखील बाब्रस, पोपट जगताप, दत्ता घोगरे, अजित शेंडगे, प्रशांत शिंदे, अहेमदरजा सय्यद, किसन शेंडे, बाळू म्हेत्रे, संजय शिंदे, सौरभ शिंदे, अनिकेत वाघ, गजानन गवळी, अमर गाडे, हरिदास हराळे, स्वप्निल मखरे, सुभाष खरे, रामदास चौगुले, मनोज पवार, सचिन चौगुले, गणपत गवळी व परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज भापकर, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, रमेश बनसोडे, बापू भिसे, संतोष काळे, प्रवीण शिंदे आदींनी परिश्रम घेतले.