याप्रसंगी श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे शिक्षक दादासाहेब जावीर, यशवंतराव केवारे, तानाजी गलांडे व ओंकार जौंजाळ या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर केले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा अभियानांतर्गत सर्व मान्यवरांना वसुंधरेची शपथ नगरपरिषदेचे कर्मचारी अल्ताफ पठाण यांनी वाचन करून दिली.
तसेच बँड पथकातील विद्यार्थ्यांनी ध्वजगीत सादर केले. सर्वांना नगर परिषदेच्या कार्यालयात चहापान करण्यात आले. यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी, शहरातील विविध राजकीय पक्षांचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर या ध्वजारोहण समारंभास उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १६ इंदापूर स्वातंत्र्य दिन
फोटो ओळ : इंदापूर नगरपरिषदेसमोर ध्वजारोहणप्रसंगी मानवंदना देताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी रामराजे कापरे व मान्यवर.