इंदापूर - युवतीवर धमकावत वारंवार बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी तसेच दोघांचे आक्षेपार्ह फोटो लग्न ठरलेल्या तरुणाला दाखविण्याची धमकी देणाऱ्या तरुणासह त्याच्या आईवडिलांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लॉजवर घडला.सतीश भीमराव मोरे, छाया भीमराव मोरे, भीमराव काशीनाथ मोरे (सर्व रा. कवठळी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १९ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी परीक्षेसाठी इंदापूर महाविद्यालयात आली असता आरोपीने तिला धमकावत लॉजवर नेऊन बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तिला एसटीमध्ये बसवले. हा प्रकार तिने आरोपीच्या आई-वडिलांना सांगितला. त्यांनी तिला शिवीगाळ व दमदाटी केली. ती गरोदर राहिल्याचे समजताच आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यासाठी दिल्या. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. माझे लग्न ठरल्याचे सांगताच त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो होणा-या नव-याकडे पाठवण्याची धमकी दिली.
वारंवार बलात्कार करून केला गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 2:20 AM