शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

इंदापूरला कुत्र्याचा धुमाकूळ; ११ जणांना चावा

By admin | Published: May 11, 2017 4:24 AM

शहरातील चाळीस फुटी रस्ता ते व्यंकटेशनगर या पट्ट्यात बुधवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घालत केवळ अर्ध्या तासात

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : शहरातील चाळीस फुटी रस्ता ते व्यंकटेशनगर या पट्ट्यात बुधवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घालत केवळ अर्ध्या तासात सुमारे अकरा जणांचा चावा घेतला. त्यामध्ये लहानांसह वृद्ध महिलांचा समावेश होता.त्याच्या या हल्ल्याने सैरभैर झालेल्या युवकांनी पिसाळल्याच्या संशयावरून दोन कुत्री मारून टाकली. तरीही कुत्रे चावल्याची तक्रार घेऊन लोक येत होते. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे सात ते आठ कर्मचारी दुपारी उशिरापर्यंत त्या कुत्र्याचा शोध घेत होते.सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला सुरू केला. त्याच्या तावडीत जी व्यक्ती सापडेल त्याच्या तोंडात येईल त्या अवयवाचा करकचून चावा घेत हे कुत्रे सगळीकडे सैरावैरा पळत सुटले. इंदापूर महाविद्यालयासमोरच्या चाळीस फुटी रस्त्यापासून ते डॉ. आंबेडकरनगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर, कसबा पेठ, व्यंकटेशनगर असा धुमाकूळ त्याने घातला. त्याच्या चाव्यामुळे जखमी झालेल्यांची रिघ उपजिल्हा शासकीय रुग्णालयात लागली. कार्तिक महेश डोके (वय ५ वर्षे), वालूबाई कोंडिबा वाकळे (वय ९०), शिवम देविदास महाजन, किसाबाई गणपत गाढवे, अयान तोसिर बागवान, इल्शा रमजान बागवान, गणेश हंबीरराव लोंढे, संजय दशरथ घनवट, मिलिंद पवार, अथर्व अशोक पारेख, शिवदत्त बाबूराव वाघमोडे अशी श्वानदंश झालेल्यांची नावे आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ चंदनशिवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची तातडीने तपासणी करून श्वानदंशावरील लसी दिल्या. १०८ रुग्णवाहिकेतून या सर्वांना पुढील उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठवले.