इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी आज निवडणुका झाल्या. त्या ३९ ग्रामपंचायतींमध्ये ३० ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच निवडून आले असल्याचा दावा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केला आहे
पक्षाच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सरपंच निवडीवर भाजपाने जो आंधळे पणाने दावा केला होता तो या निवडीत फेल ठरला आहे. भाजपाच्या 'खोटे बोल पण रेटून बोला' या कार्यपध्दतीवर एक प्रकारे चपराक देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झालेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यामध्ये योग्य नियोजन करत हे यश पक्षाने प्राप्त केले आहे.
सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदु माणून त्यांची सेवा करण्याचा माणस कायम राहील अशी ग्वाही पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.
--
राष्ट्रवादीने जाहिर केलेली ३० सरपंचाची यादी अशी
सपकळवाडी सरपंच - रोहिणी तानाजी सोनवणे, अकोले सरपंच - ज्ञानदेव केरबा दराडे, पोंधवडी सरपंच - लक्ष्मण कोंडीबा पवार, लोणी देवकर सरपंच - कालिदास हरिश्चंद्र देवकर, चिखली सरपंच - वैशाली सोमनाथ अर्जुन, निमगाव केतकी सरपंच - प्रविण दशरथ डोंगरे, निंबोडी सरपंच - रोहिणी मनोज घोळवे, अंथुर्णे सरपंच- लालसो संभाजी खरात, रुई सरपंच कृष्णाई तात्या कचरे, बळपुडी सरपंच - बायडाबाई शंकर चोरमले, भांडंगाव सरपंच - अपर्णा पांडुरंग जाधव, हागारेवाडी सरपंच - रेश्मा स्वप्नील सूर्यवंशी, काटी सरपंच - रेखा विठ्ठल मरगळ, कळस सरपंच - वृषाली संग्रामसिंह पाटील, तरंगवाडी सरपंच - सविता कांतीलाल बुगणे, तक्रारवाडी सरपंच - सतीश विनायक वाघ, नरसिंहपूर सरपंच - अश्विनी चंद्रकांत सरवदे, लासुरने सरपंच - रुद्रसेन सुरेंद्रनाथ पाटील , शेटफळगढे सरपंच - रुपाली संतोष वाबळे, पिंपरी बुद्रुक सरपंच - ज्योती श्रीकांत बोडके, शहा सरपंच - पूनम संतोष कडवळे, निमसाखर सरपंच - धैर्यशील विजयसिंह रणवरे पाटील, सणसर सरपंच - ऍड. रणजित बाबुराव निंबाळकर, गोतोंडी सरपंच - गुरुनाथ भागवत नलवडे, सराफवाडी सरपंच - चांगुणा बिभीषण जाधव, चांडगाव सरपंच - देविदास ज्ञानदेव आरंडे, व्याहळी सरपंच - दादासो सुखदेव पाटोळे, कुंभारगाव सरपंच - उज्ज्वला दत्तात्रय परदेशी, कळंब सरपंच - विद्या अतुल सावंत, पिंपळे सरपंच - कुंडलिक जनार्धन भिसे.